नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांकडे सुपूर्द
पिंगुळी : पिंगुळी येथील भूपकरवाडी परिसरात एक अनोळखी व संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पिंगुळी गोंधळपूर पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलीस पाटील शंकर सातार्डेकर यांनी घटनास्थळी धाव घेत सदर व्यक्तीची चौकशी केली. मात्र, चौकशीदरम्यान समाधानकारक माहिती मिळून न आल्याने त्यांनी तात्काळ कुडाळ पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पिंगुळी पोलीस पाटील सतीश माडये तसेच व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष दीपक गावडे यांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून सदर संशयास्पद व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या वाडी-वस्तीमध्ये अनोळखी अथवा संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्यास स्वतःहून कोणतीही कारवाई न करता तात्काळ पोलीस पाटील किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने केलेल्या कार्यवाहीमुळे या घटनेची वेळीच दखल घेण्यात आली.

Subscribe










