कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंब्रड मधली राऊळवाडी येथे आजाराला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत तरुणीचे नाव प्रणिता प्रसाद चव्हाण (२०) असे आहे. याबाबत केशव सोनू चव्हाण (रा. आंब्रड) यांनी आवळेगाव पोलीस दूरक्षेत्रात खबर दिली. प्राथमिक माहितीनुसार, प्रणिता चव्हाण ही गेल्या काही वर्षांपासून आजारी होती. तिला वारंवार फिट येत हो. या दीर्घकालीन आजाराला कंटाळून तिने घरात कोणीही नसताना घरातील बेडरूममध्ये लोखंडी बाराला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. व मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. सिंधुदुर्गनगरी येथे पाठवला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल श्री. तिवरेकर करीत आहेत.