कुडाळ नमो उद्यानाची समितीकडून झाली तपासणी

विभागीय स्तरावरची झाली तपासणी

कुडाळ प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता हे नमो उद्यान उभारून त्याचे परीक्षण करून विभाग स्तरावर त्याचे परीक्षण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे कुडाळमध्ये परीक्षण समिती दाखल झाली त्यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नमो उद्यानाचे परीक्षण केले. या परीक्षण समितीचे स्वागत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केले.
शासनाकडून नमो उद्यान ही संकल्पना राबविण्यात आली होती आणि त्यासाठी प्रत्येक नगरपंचायत नगरपालिका यासाठी १ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता हे नमो उद्यान जुलै पर्यंत पूर्ण करावे असे आदेश होते कुडाळ नगरपंचायतीने सांगली येथे असलेल्या खुल्या क्षेत्रामध्ये हे नमो उद्यान उभारले या नमो उद्यानाचे परीक्षण करण्यासाठी आज (बुधवारी) समिती दाखल झाली या समितीमध्ये कोकण विभाग नगर परिषद प्रशासन विभागीय सह आयुक्त विजयकुमार म्हसाळ, कोकण विभाग नगरपरिषद प्रशासन नगरपरिषद प्रशासन उपायुक्त सागर घोलप, कोकण विभाग नगर प्रशासन कार्यकारी अभियंता रूपाली पाटील, कोकण विभाग स्थापत्य अभियंता शशिकांत पवार यांच्यासह सिंधुदुर्ग नगर प्रशासन आयुक्त विनायक औंधकर तसेच मुख्याधिकारी उपस्थित होते.
या सर्वांचे स्वागत नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी केले यावेळी गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, नगरसेविका चांदणी कांबळी, मुख्याधिकारी खंडू पवळ, अभियंता सोनाली हळदणकर, लेखाधिकारी स्वप्निल पाटील, रसिका नाडकर्णी, श्री नाटेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

या समितीने नमो उद्यानाचे पूर्णपणे पाहणी केली व तपासणी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ व वेंगुर्ला या नगर परिषदांच्या नमो उद्यानांची तपासणी करण्यात आली कोकण विभागात चार नगरपरिषदांच्या नमो उद्यानाची पाहणी केली जाणार आहे.

error: Content is protected !!