सेवेचा संकल्प… आणि तत्परतेची प्रचिती!

लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरामध्ये तब्बल १३० नागरिकांची तपासणी

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, SSPM हॉस्पिटल पडवे व मिलिंद नाईक मित्र मंडळ यांचा संयुक्त उपक्रम

रोटरी क्लब ऑफ कुडाळ, SSPM हॉस्पिटल पडवे व मिलिंद नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे आयोजित मोफत वैद्यकीय शिबिरामध्ये तब्बल १३० नागरिकांची तपासणी करण्यात आली.

या तपासणीमध्ये ४१ नागरिकांना डोळ्यांच्या समस्या व चष्म्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. या सर्व ४१ लाभार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून सुयश हॉस्पिटलच्या सौजन्याने रो. डॉ. सौ. जयश्री संजय केसरे यांनी मोफत चष्मे उपलब्ध करून दिले.

या उपक्रमाचे सर्वात विशेष आणि कौतुकास्पद वैशिष्ट्य म्हणजे—दि. ६ ऑगस्ट रोजी झालेल्या शिबिरानंतर अवघ्या दोन दिवसांत, म्हणजे दि. ८ ऑगस्ट रोजी सर्व ४१ लाभार्थ्यांचे चष्मे तयार करून देण्यात आले!

दि. ८ ऑगस्ट रोजी लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथील सांस्कृतिक हॉलमध्ये झालेल्या दशावतारी नाट्यप्रयोगादरम्यान या ४१ लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष रो. मकरंद नाईक, कुडाळ पंचायत समितीचे सभापती श्री. मिलिंद नाईक, तुळसुली गावचे सरपंच श्री. जयराम वारंग, चेंदवणचे माजी सरपंच व चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे पुरस्कर्ते श्री. देवेंद्र नाईक, सुप्रसिद्ध निवेदक राजा सामंत सुनील नाईक प्रथमेश नाईक महेंद्र नाईक,सुचित वेंगुर्लेकर,विलास वारंग इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सुमारे ५०० ते ६०० नागरिकांना रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची विस्तृत माहिती अध्यक्ष रो. मकरंद नाईक यांनी दिली.
🙏 आरोग्यसेवा हीच खरी समाजसेवा!
गरजू नागरिकांच्या डोळ्यांना प्रकाश देण्यासोबतच त्यांच्या जीवनात आनंदाची नवी दृष्टी देणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.
विशेष आभार व अभिनंदन
रो. डॉ. सौ. जयश्री संजय केसरे
सुयश हॉस्पिटल
तसेच या सेवाकार्यासाठी सहकार्य करणारे SSPM हॉस्पिटल पडवे, मिलिंद नाईक मित्र मंडळ, लिंगेश्वर विद्यालय तुळसुली आणि सर्व सहकारी यांचे मनःपूर्वक आभार! 🙏🌹
Rotary Club of Kudal
Service Above Self 🌍🤝

error: Content is protected !!