ब्युरो न्यूज: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रीपद स्वीकारताच अनेक महत्वाचे निर्णय शिक्षण क्षेत्रात घेतले असून सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी भाषा सर्व शाळांमधे अनिवार्य केली आहे. दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीत पाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता ‘जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत रोज सकाळी शाळांमध्ये गुंजणार आहे. पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील काही निवडक चांगल्याबाबींचा शिक्षणात समावेश केला जाणार असल्याचे भुसे म्हणाले. याबाबतचं नियोजन हे पूर्ण झालेले आहे. तत्पूर्वी शिक्षकांना त्याची ट्रेनिंग या चालू वर्षात दिली जाईल असे भुसे म्हणाले.
शालेय शिक्षणात येणार सीबीएसई पॅटर्न
पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील निवडक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल, असे असे मंत्री दादा भुसे म्हणाले आहेत. राज्यातील सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी वगैरे सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत दर दिवशी शाळा भरण्याआधी वाजवावे. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय वयापासून महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक महत्त्व समजून घेता येईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.