वेंगुर्ला–कुडाळ तिठ्यावर ओमनी व दुचाकीचा अपघात;

दुचाकीस्वार गंभीर जखमी

वेंगुर्ला–कुडाळ तिठ्यावर ओमनी चारचाकी व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी दुचाकीस्वार हा कुडाळ–तेंडोली येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघातानंतर जखमीला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी त्याला वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

या अपघातामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांकडून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू असून, पुढील तपास वेंगुर्ला पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!