बांदा : आरोसबाग परिसरात थंडीपासून बचावासाठी घेतलेल्या शेकोटीत होरपळून एका सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, अविनाश चांदेकर हे आपल्या घराजवळ शेकोटी घेत असताना अचानक आग भडकली. यात ते गंभीररीत्या होरपळले. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
अविनाश चांदेकर हे येथील श्री स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या बांदा शाखेत शिपाई पदावर कार्यरत होते. काही वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती मिळताच बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










