भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्याकडून वेताळ बांबर्डे देऊळवाडी शाळेला कलर प्रिंटर भेट

कुडाळ : भारतीय जनता पार्टी ओरोस मंडल अध्यक्ष श्री आनंद उर्फ भाई सावंत यांच्याकडून पूर्ण प्राथमिक शाळा देऊळवाडी वेताळ बांबर्डे शाळेसाठी स्वखर्चाने कलर प्रिंटर देण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी ओरस मंडल चे सरचिटणीस श्री शैलेश बांबर्डेकर व सरचिटणीस दिनेश जैतापकर ओबीसी जिल्हा सेल अध्यक्ष छोटू पारकर, वेताळ बांबर्डे विभागाचे शक्ती केंद्रप्रमुख अरविंद बांबर्डेकर, महिला मोर्चा सोस्मिता बांबर्डेकर व ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथ कदम, प्रदीप गावडे , साजुराम नाईक, रश्मी तिवरेकर गावातील ग्रामस्थ प्रसाद बांबर्डेकर, महादेव परब, संदीप सावंत, दिनेश शिरवलकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोनू कदम आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!