कुडाळ : प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली – केरवडेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११ वाजता संपन्न होणार आहे. तर स्नेहसंमेलन समारंभ २० डिसेंबर २०२५ सायंकाळी ८ वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडेचे अध्यक्ष श्रीधर सगुण पेडणेकर भुषवणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार दीपक केसरकर, माजी निवृत्त विज्ञान शिक्षक रॉबर्ट फ्रान्सिस डिसोजा, निवासी नायक तहसीलदार अमरसिंह जाधव उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्था अध्यक्ष श्रीधर पेडणेकर , संस्था उपाध्यक्ष अर्जुन परब, संस्था कार्याध्यक्ष वामन गावडे , संस्था सचिव अंकुश जाधव , संस्था खजिनदार देवदत्त चुबे , मुख्याध्यापक सुरेंद्र खोत , शालेय मुख्यमंत्री मयुरेश भोई , विद्यार्थी प्रतिनिधी कविता नाईक , सांस्कृतिक मंत्री कल्पेश साळगावकर तसेच संस्था पदाधिकारी संस्था संचालक कर्मचारी आजी-माजी विद्यार्थी शिक्षण प्रेमी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.



Subscribe






