कणकवली : नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठा विजय मिळाल्यानंतर शहरात विजयोत्सवाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक येथे लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
“नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…! नाईक हितचिंतक” अशा आशयाचा हा बॅनर सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. निवडणुकीतील निकालानंतर राजकीय वातावरण तापले असतानाच, या बॅनरमधील सूचक आणि आक्रमक शब्दप्रयोगामुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
शहर विकास आघाडीच्या विजयानंतर समर्थकांकडून आनंद व्यक्त केला जात असून, या बॅनरकडे राजकीय टोला म्हणून पाहिले जात आहे. मात्र, बॅनर कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावला याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या बॅनरमुळे कणकवलीत राजकीय चर्चांना पुन्हा एकदा वेग आला असून, नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी काळात यावर संबंधितांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.