श्रीदेवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे जोशी यांची अभिनय व वक्तृत्व कार्यशाळा संपन्न

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे प्रसिद्ध प्रशिक्षक निलेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अभिनय व वक्तृत्व कौशल्य’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना कसे बोलायचे, कसे चालायचे, ओंकार कसा घ्यायचा, आवाजाचा व्यायाम कसा करायचा याविषयी अत्यंत प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. वक्तृत्वात आत्मविश्वास कसा वाढवावा, बोलताना शारीरिक हावभाव कसे ठेवावेत, अभिनय करताना संवाद कसा ओतप्रोत करावा याबाबत त्यांनी प्रत्यक्ष सराव करून घेतला. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व व अभिनयाविषयीची रुची आणि आत्मविश्वास वाढल्याचे दिसून आले.

या कार्यशाळेचे विशेष म्हणजे “भाऊ, मलाच असं मार्गदर्शन व्हावं” अशी भावना अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण तसेच चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई . यांच्या वतीने प्रशिक्षक निलेश जोशी यांचा सन्मान ‘शाल, श्रीफळ’ देऊन करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी विद्यालय तथा मंडळाच्या वतीने निलेश जोशी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!