कलावलय वेंगुर्ला आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा.
सिंधुदुर्ग : कलावलय वेंगुर्ले,सिंधुदुर्ग आयोजित बी.के.सी असोसिएशन,मुंबई पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती २८ व्या खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबईची (चारू) एकांकिका प्रथम,परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर यांची (कलम ३७५ )एकांकिका द्वितीय ,तर गायन समाज देवल क्लब-कोल्हापूर यांची (ऑलमोस्ट डेड) एकांकिकेने तृतीय क्रमांक पटकावला.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या मधुसूदन कालेलकर बहूउद्देशीय सभागृह ,कॅम्प वेंगुर्ला कवी आरती प्रभू रंगमंचावर पार पडलेल्या या एकांकिका स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना
स्पर्धेचे परीक्षक सुनील गुरव, तुषार भद्रे, कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र (बाळू) खामकर,उपाध्यक्ष संजय पुनाळेकर,प्रकाश परब,सुनिल रेडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी कलावलयचे पदाधिकारी आणि नाट्य कलाकार आणि नाट्यरसिक आदि उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
सांघिक एकांकिका :
प्रथम- चारू अंब्रेश्वर थिएटर्स-मुंबई (चारू),द्वितीय –परिवर्तन कला फाऊंडेशन कोल्हापूर (कलम ३७५),
तृतीय –दि गायन समाज देवल क्लब-कोल्हापूर (ऑलमोस्ट डेड) तर उत्तेजनार्थ सांघिक पारितोषिक प्रथम कलासक्त मुंबई, (पूर्णविराम),व्दितीय मुख्तलीफ थिएटर-कोल्हापूर, (निर्झर)
उत्कृष्ट दिग्दर्शन : प्रथम सागर जेठवा (चारू),व्दितीय-वैष्णवी पोतदार (कलम ३७५) ,तृतीय-प्रमोद पुजारी (ऑलमोस्ट डेड)
उत्कृष्ट पुरुष अभिनय: प्रथम-विशाल दुराके (ओळख),व्दितीय-प्रमोद पुजारी ((ऑलमोस्ट डेड),तृतीय प्रथमेश चुबे(चारू)
स्त्री अभिनय प्रथम : प्रथम – जान्हवी जाधव(चारू),व्दितीय-सानिका कुंटे(ऑफलाइन)तृतीय-प्राची कात्रे(ओळख)
उत्कृष्ट नेपथ्य प्रथम – रमा कुलकर्णी व ऋतुराज कुलकर्णी (ऑलमोस्ट डेड)
उत्कृष्ट प्रकाश योजना प्रथम –चेतन पडवळ (चारू)
उत्कृष्ट पार्श्वसंगीत प्रथम – ओंकार वर्णे (कलम ३७५)
पुरुष अभिनय उत्तेजनार्थ प्रथम – साईल देसाई (ऑफलाइन),व्दितीय-दिपक जानकर(मशाल),तृतीय -योगेश कदम(इंटरोगेशन)
‘
स्त्री अभिनय उत्तेजनार्थ प्रथम – कांचन परुळेकर(विठाई),व्दितीय-मंगल डिसोझा (विवर)तृतीय- वर्षा जाधव(चोली के पिछे क्या है)
स्पर्धेचे परीक्षण सुनील गुरव, तुषार भद्रे यांनी केले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पुनाळेकर तर आभार कलावलयचे अध्यक्ष सुरेंद्र (बाळू)खामकर यांनी मानले.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत १७ एकांकिका सादर झाल्या. या स्पर्धेत सिंधुदुर्ग सह रत्नागिरी,कोल्हापूर, मुंबई,ठाणे येथील स्पर्धक संघ सहभागी झाले होते.स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.