बांधकाम कामगार संघटना कुडाळ यांच्याकडून कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

कुडाळ : कै. प्रथमेश मार्गी यांच्या कुटुंबियांना बांधकाम संघटना कुडाळ यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून रु. ५००००/- रोख रक्कम देण्यात आली.

प्रथमेश विलास मार्गी, रा. नेरूर चौपाटी यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले होते. आज कामगार संघटना कुडाळ यांच्या माध्यमातून कै. प्रथमेश यांच्या कुटुंबियांना नेरूर येथील निवासस्थानी भेट घेत रोख रु. ५००००/- ची आर्थिक मदत करण्यात आली. यावेळी त्यांचे वडील विलास विठ्ठल मार्गी, आई विनायकी विलास मार्गी, भाऊ प्रदीप विलास मार्गी यांनी सहकार्याबद्दल संघटनेचे आभार मानले.

यावेळी बांधकाम संघटनेचे अध्यक्ष राजू पटेकर, उपाध्यक्ष राजू गुरव, गजानन सुळेभावी, परशराम धामणेकर, राजू मेलगे, वामन जाधव, अजय तारयाळकर, संजू हुंदर, नागेश देसुरकर, अनिल पाटील, मारुती देसुरकर, तुकाराम खरुजकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!