बांदा : गाळेल येथे कालव्यात बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. मृतदेह कुजल्यामुळे तो दोन-तीन दिवसांपूर्वी त्या ठिकाणी पडला असावा, असा संशय आहे. ही घटना आज सायंकाळी उघडकीस आली. पाण्याच्या शोधात असताना तो कालव्यात कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. हा कालवा गोवा व महाराष्ट्र सीमेवर आहे. त्या ठिकाणी गुरे चारण्यासाठी गेलेल्या काही लोकांना हा बिबट्या मृतावस्थेत दिसून आला. घटनास्थळी वनपाल प्रमोद सावंत, अतुल पाटील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Subscribe









