
महिलेच्या डोळ्यांवर स्प्रे मारून मंगळसूत्र चोरले
दोन अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू
केतन शिरोडकर/पिंगुळी : पिंगुळी येथील सराफदारवाडी परिसरात चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील उपलब्ध माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या घरात घुसून तिच्या डोळ्यांवर स्प्रे मारला. तिला दिसायचे बंद होताच तिच्या डोळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तेथून पळ काढला.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, चोरीच्या घटनेमागे नेमके कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर तपास केला जात आहे. संशयित व्यक्तींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या घटनेमुळे सराफदारवाडी परिसरातील नागरिकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस तपासातून या घटनेचा लवकरच उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



Subscribe









