युवतीनेही उडी घेतल्याची माहिती.
दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट आढळले घटनास्थळी
शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी आत्महत्येच्या दोन घटनांची माहिती समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, युवतीचा शोध घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती आहे.
घटनास्थळी दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट आढळून आल्याने पोलिसांकडून या साहित्याची तपासणी करून संबंधित व्यक्तींची ओळख व घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेची माहिती शहरात पसरताच मोती तलाव परिसरात नागरिकांची आणि बघ्यांची मोठी गर्दी झाली. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत का, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेचे नेमके कारण आणि संपूर्ण वस्तुस्थिती समोर येणार आहे.
मोती तलावातील या घटनेने सावंतवाडी शहर हादरले असून, नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


Subscribe










