२ किलो व्हेल माशाच्या उलटीसह तब्बल २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

कुडाळ तालुक्यातील ३ तर रत्नागिरी येथील एकजण ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत कारवाई

कुडाळ : २ किलो व्हेल माशाच्या उलटीसह तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शनिवारी सायं. ६.२० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या सिंधुदुर्ग शाखेने कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायं. ६.२० वाजण्याच्या सुमारास कुडाळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना प्रतिबंधित व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषणला मिळाली. त्यानुसार पणदूर ते कडावल रस्त्यालगत कुलस्वामिनी एंटरप्रायझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कार्यालयाच्या बाजूला सापळा रचत संकेत संतोष चव्हाण (वय-26 वर्षे, रा.रवळनाथनगर, ओरोस मूळ रा. निरूखे, ता.कुडाळ), महेश लक्ष्मण रेवणकर ( वय-35 वर्षे, सध्या रा. कुवारबांव रत्नागिरी मूळ रा. रेवंडी,ता.मालवण), अमेय पुंडलिक देसाई (वय-31 वर्षे, रा. ओरोस रवळनाथ नगर, ता.कुडाळ), अमित अरूण अणावकर (वय-39 वर्षे, रा. अणाव,ता.कुडाळ) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३ किंलो ३७३ ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी, एक काळया रंगाची होंडा कंपनीची युनीकॉर्न मोटारसायकल, एक ग्रे रंगाची मारूती सुझुकी कंपनीची इर्टीगा चारचाकी असा एकूण २ कोटी ४६ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कुडाळ पोलीस ठाणे येथे त्यांचेविरूध्द वन्यजीव(संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 39,42,43,44,48,51 प्रमाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा.श्री.दिपक शेलार, परि. पोलीस उपअधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक सनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, HC विल्सन डिसोजा, आशीष जामदार, PC अमर कांडर यांच्या पथकाने केलेली आहे.

error: Content is protected !!