कुडाळ – कविलकाटे येथे घराच्या स्लॅबवरून पडल्याने प्रौढाचा मृत्यू

चाफ्याची फुले काढत असताना गेला तोल

कुडाळ : तालुक्यातील कविलकाटे-मधलीवाडी येथे घराच्या स्लॅबवरून चाफ्याची फुले काढताना तोल जाऊन खाली पडल्याने संतोष भास्कर मसुरकर (५९ रा. मधलीवाडी, कविलकाटे, ता. कुडाळ) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४ वा. च्या सुमारास घडली.

या घटनेची फिर्याद अरविंद अशोक जळवी रा कविलकाटे कुडाळ मिळालेल्या माहितीनुसार, संतोष मसुरकर हे त्यांच्या घराच्या स्लॅबवर असलेली पाण्याची टाकी साफ करण्यासाठी गेले होते. पाण्याची टाकी साफ केल्यानंतर ते स्लॅबवरून चाफ्याची फुले काढण्यासाठी गेले. फुले काढत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जमिनीवर खाली पडले. या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी कुडाळ येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांना गोव्याच्या दिशेने नेत असताना प्रकृती अधिक बिघडल्याने पुन्हा दुसऱ्या एका जवळच्या एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संतोष मसुरकर यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची खबर अरविंद अशोक जळवीरा (रा. कविलकाटे, कुडाळ) यांनी दिली.

error: Content is protected !!