सिंधुदुर्ग : दिल्ली येथे भाजपचे बहुमताचे सरकार आले 70 पैकी 45 उमेदवार निवडून आले या भाजपच्या यशाचा जल्लोष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी करण्यात आला.
सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यालय ओरोस वसंत स्मृती येथे भाजपा जिल्हा पदाधिकारी/कार्यकर्ते यांनी जल्लोष केला त्यावेळी जिल्हाध्यक्ष श्री प्रभाकरजी सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, पप्या तवटे, सुनील बांदेकर, सरपंच परशुराम परब , सुभाष बांबुळकर, गौरव घाडी, महिला ओरोस मंडल अध्यक्षा सुप्रिया वालावलकर, जिल्हा कार्यालय प्रमुख समर्थ राणे, अजय घाडीगांवकर, अक्षय दळवी,श्रेयस पेडणेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते