पनवेल हादरलं!४ वर्षाच्या चिमुरडीवर ६३ वर्षीय वृद्धाकडून अत्याचार

पनवेल: पनवेलमध्ये संतापजनक घटना घडली आहे.पनवेलमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पनवेलमधील शेडुंगमध्ये ही घटना घडली आहे. पनवेलच्या शेंडुगमध्ये हरी नावाच्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे सविस्तर वृत्त?

पनवेल तालुक्यातील शेडुंगमध्ये एका 4 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हरी या 63 वर्षीय नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. पीडित मुलगी आणि आरोपी एकाच सोसायटीमध्ये राहण्यास आहे. याच खाजगी सोसायटीमधील लिफ्टच्या बाजूला असलेल्या भिंतीलगत ज्येष्ठ नागरिकाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला.पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर तिच्या पालकांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

पोस्को अंतर्गत कारवाई

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हरी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ नराधम आरोपी हरी याला अटक केली आहे.

error: Content is protected !!