बंदुकीची गोळी लागल्याने एकाचा मृत्यू

कोलगाव येथील एकजण ताब्यात

शिकारीला गेले असता घडली घटना

सावंतवाडी : ओवळीये जंगल परिसरात शिकारीसाठी गेलेल्या युवकांपैकी एकाचा सहकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळीने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली. सचिन मर्गज (वय २८, रा. सांगेली, ता. सावंतवाडी) असे मृत युवकाचे नाव आहे.

या प्रकरणी सुप्रियान डान्टस (वय ३५, रा. कोलगाव) याला पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. गोळी कशी सुटली, नेमकी काय परिस्थिती होती याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सचिन मर्गज याचा मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी येथील कुटीर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. या शिकारी गटात आणखी काही जण सहभागी असल्याची माहिती समोर येत असून त्यांच्या भूमिकेबाबतही पोलिस तपास करत आहेत.

error: Content is protected !!