सिद्धेश गावडे अपहरण व मारहाण प्रकरणाचा तो बनाव

वेगळीच माहिती आली समोर

उलट आता सिद्धेशवरच गुन्हा दाखल होणार

कुडाळ : फ्लॅटच्या भाड्याचे पैसे न दिल्याच्या रागातून आपले अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची खोटी तक्रार देणाऱ्या कुडाळ येथील सिद्धेश गावडे याने बनाव रचल्याची धक्कादायक माहिती पोलिसात उघड झाली आहे. त्यामुळे आता खोटी माहिती दिल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

कुडाळ येथील सिद्धेश गावडे याने खानोली येथील किशोर वरक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यात वरक यांच्याशी झालेल्या भांडणात आपल्याला कारमधून जबरदस्तीने नेऊन लाथा-बुक्यांनी व दांड्याने मारहाण करण्यात आली होती तसेच हात-पाय बांधून तोंडात फडका कोंबला होता तसेच आपल्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

मात्र तपासात ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी सिद्धेश आपण पणजी येथील आपल्या कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही मध्ये दिसून आला होता. त्यामुळे अन्य पुरावे सुद्धा त्याच्या विरोधात मिळाले होते. त्यामुळे सिद्धेश याने बनाव केल्याचे उघड झाले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास केल्यानंतर फ्लॅटच्या भाड्याच्या वादातून त्याने हा प्रकार केल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर बनाव रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!