१८ वर्षीय युवतीची गळफास घेत आत्महत्या

सावंतवाडी तालुक्यातील घटना

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

बांदा: नेतर्डे – खोलबागवाडी येथे युवतीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. मयुरी आनंद परब (वय १८) असे तिचे नाव आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळच्या वेळी ही बाब घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलीस कर्मचारी सिद्धार्थ माळकर, कोळेकर, संगीता बुर्डेकऱ्यांनी भेट देत पंचनामा केला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!