पोलिसांकडून तपासाबाबत गुप्तता
माड्याची वाडी ऍड. किशोर वरक प्रकरण
कुडाळ : भाड्याचे पैसे दिले नाही म्हणून विचारणा केल्याप्रकरणी राग मनात धरून अपहरण करून मारहाण केल्याची तक्रार बनाव असल्याचे समोर येत आहे याबाबत आता उलट सुलट चर्चा होत असून नेमका प्रकार काय याबाबत पोलीस यंत्रणेकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने यामागील गुढ वाढले आहे. ऑक्टोंबर महिन्यात कुडाळ शहर परिसरात हा प्रकार घडला भाड्याचे पैसे दिले नाही म्हणून विचारणा केली उलट विचारणा केल्यानेच संबंधिताने आपले अपहरण करून बांदा येथे नेले तिथेमारहाण करून टाकले अशी फिर्याद दाखल करण्यात आली होती या फिर्यादीवरून बांदाआणि निवती पोलीस ठाण्याचे पोलीस पथक कामाला लागले फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयीतावर गुन्हे दाखल करण्यात आले आणि तपासाची चक्रे फिरवली मात्र संशयीताने वरीष्ठ पातळीवर दाद फिर्याद मागितली. आपल्यावर होत असलेल्या अन्यायावर सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केला.. त्यानंतर आता कालांतराने हा प्रकार बनाव असल्याची चर्चा व्हायरल होत आहे नेमका हा प्रकार काय.. हा प्रकार बनाव आहे की वास्तव आहे याबाबतचा तपास मात्र पोलिसांनी काय केला याची माहिती अद्यापही पुढे आली नाही मात्र हे अपहरण आणि मारहाण बनाव असल्याचे बोलले जात आहे तशी चर्चा व्हायरल होत आहे त्यामुळे पोलीस यंत्रणेसमोरही या तपासाबाबत गुप्तता पाळण्यामागे नेमकं कायया प्रकरणा मागील नेमकी वास्तवता पोलीस पुढे का आणत नाही अशी चर्चा आता होत आहे हा बनाव की हे वास्तव आहे याबाबत उलगडा होणे आवश्यक असून पोलीस यंत्रणा गुप्तता का पाळत आहे असे सवाल उपस्थित होत आहेत त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.


Subscribe










