भारतात पुन्हा लॉकडाऊन?

चीन मध्ये धुमाकूळ घातलेला HMPV व्हायरस महाराष्ट्राच्या वेशीवर

लहान मुलांना व्हायरसचा सर्वात जास्त धोका

मुंबई: संपूर्ण जगाला वेठीस धरनाऱ्या कोरोना व्हायरसनंतर आता जगावर पुन्हा एकदा नव्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये HMPV व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान भारतातील बंगळुरु शहरात HMPV व्हायरसचे दोन रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे.अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या व्हायरस मुळे भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का अशा शंका-कुशंका ऐकायला मिळत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. रवी गोडसे यांनी एका वृत्त वाहिनिशी संवाद साधत HMPV व्हायरस बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली.

HMPV व्हायरसमुळे किती धोका संभवू शकतो?

एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नसल्याचे त्यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. त्यामुळे भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले.

error: Content is protected !!