एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाइफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग येथे जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. वंदना गावपांडे, डॉ.आर. एस. कुलकर्णी, हेमंत भारती, शुभम तांबे तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचारी व विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन हॉस्पिटलच्या ब्लड बँक विभाग प्रमुख मनीष यादव यांनी केले होते. रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि अधिकाधिक नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
रक्तदात्यांचे मनोबल वाढावे व त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव व्हावा यासाठी रक्तदानानंतर सर्व रक्तदात्यांना स्मृतिचिन्ह (Gift) देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्लड बँक विभाग प्रमुख मनीष यादव आणि विभागातील सर्व कर्मचारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.


Subscribe










