सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

सर्व स्तरातून रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्त उपलब्ध करून द्यावे

सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांचे आवाहन

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्रामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून रक्तदान शिबिरे आयोजित करावीत. तसेच जिल्हा रुग्णालयामध्ये रक्त उपलब्ध करून द्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात सध्या अवघ्या रक्त पिशव्या उपलब्ध असून दिवसाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. वाढत राहणारी मागणी व कमी होत चाललेला रक्तसाठा यामुळे रक्तपिशव्या पूर्णपणे संपुष्टात येऊन जोखमीच्या रुग्णांसाठी रक्तपुरवठा कमी पडण्याची शक्यता न करता येत नाही. भविष्यात उद्भवणारी रक्ताची टंचाई पाहता यावर लवकरात लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तरी सर्वांनी आपल्या स्तरावर रक्तदान शिबिरे आयोजित करून सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात रक्त उपलब्ध करून द्यावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांनी केले आहे.

error: Content is protected !!