SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे येथे 82 वर्षीय रुग्णावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

पडवे : SSPM Lifetime Hospital, Padave येथे मोठ्या आतड्याच्या कर्करोगावर (Carcinoma Descending Colon) करण्यात आलेली अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. या यशामुळे रुग्णालयाच्या प्रगत शस्त्रक्रिया सेवांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

82 वर्षीय महिला रुग्ण (Mrs. Laxmi V. Kulkarni ) यांना मोठ्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान झाल्यानंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन वैद्यकीय पथकाने Exploratory Laparotomy with Diverting Stoma Procedure ही जटिल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

ही शस्त्रक्रिया Dr. Anup Tamhankar आणि Dr. Surabhi यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. संपूर्ण ऑपरेशनदरम्यान शस्त्रक्रिया विभागातील टीमने उत्कृष्ट समन्वय दाखवला.

ऑपरेशन थिएटर टीममध्ये Kavita Oroskar, Aniket Baswar, Chetan Tarkar, Akshata Rane, Jagannath Kerkar, Sushant Bandekar तसेच वॉर्डबॉय रोहन हरमलकर, सुनीत आडारकर आणि गांवकर मावशी यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना पुढील उपचार व निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, अशा प्रकारच्या अत्याधुनिक आणि जोखमीच्या शस्त्रक्रिया आता SSPM Lifetime Hospital, Padve येथे नियमितपणे यशस्वीपणे पार पडत असून रुग्णांना स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गोवा किंवा कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होत आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे परिसरातील आरोग्यसेवेवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी मा . खासदार नारायणराव राणे आणि हॉस्पिटल अध्यक्षा सौ.निलम नारायणराव राणे वाहिनीसाहेब,मा. डॉ. आर. एस. कुलकर्णी, डॉ. सौरभ फडके, प्रशासकीय अधिकारी शुभम तांबे तसेच संपूर्ण हॉस्पिटल स्टाफ यांचे आभार मानले.

प्रशासकीय अधिकारी शुभम तांबे यांनी सांगितले की, ही सलग चौथी जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आहे. स्थानिक पातळीवर दर्जेदार व कमी खर्चात आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच साहेब आणि वहिनीसाहेबांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे SSPM Lifetime Hospital, Padve च्या प्रगत वैद्यकीय सेवांवरील जनविश्वास अधिक दृढ झाला आहे.

error: Content is protected !!