सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक भक्कम करण्यासाठी खासदार नारायणराव राणे यांचा पुढाकार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार नारायणराव राणे यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.

मुख्य मुद्दे :

१) वेंगुर्ला तालुक्यासाठी मोफत OPD सेवा
खासदार नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून SSPM Medical College & Lifetime Hospital, पडवे यांच्या माध्यमातून वेंगुर्ला तालुक्यात मोफत OPD सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

२) आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा
या उपक्रमासंदर्भात सिव्हिल सर्जन डॉ. श्रीपाद पाटील व ( जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग ) उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला चे डॉ .जी.व्हि.चौगुले,जिल्हा परिषद आरोग्य सभापती श्री. प्रीतीश राऊळ आणि SSPM Medical College & Lifetime Hospital चे प्रशासकीय अधिकारी श्री. शुभम तांबे यांच्यात सकारात्मक चर्चा सुरू असून, नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विविध मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात येत आहे.

३) आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा संकल्प
खासदार नारायणराव राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक व सर्वसामान्य नागरिकांसाठी सुलभ करण्याचा व्यापक मानस असून, त्यासाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे नियोजन सुरू आहे.

error: Content is protected !!