२५ मे रोजी पडवे येथे भव्य महाआरोग्य तपासणी शिबिर

सौ. नीलमताई राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

तज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली सेवा

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ (एस.एस.पी.एम.) संचलित एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे (जि. सिंधुदुर्ग) येथे सौ. निलम राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत ‘महा-आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. २५ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात सर्व विभागांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकाच छताखाली नागरिकांची मोफत तपासणी केली जाणार आहे.

या शिबिरामध्ये कर्करोग, बालरोग, त्वचारोग, नेत्ररोग, किडनी विकार, आहारतज्ज्ञ सल्ला, अस्थिरोग, जनरल सर्जरी, दंतरोग, कान-नाक-घसा, जनरल मेडिसिन, फिजिओथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग तसेच मानसोपचार अशा विविध विभागांतील तपासणी सुविधा उपलब्ध असणार आहेत. तसेच सोनोग्राफी तपासणी, एक्स-रे, लॅब तपासणी, रडी इको तपासणी, ईसीजी आणि जनरिक औषधे यांसारख्या सेवाही मोफत दिल्या जाणार आहेत.

सदर शिबिराचे आयोजन एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाइम हॉस्पिटल, पडवे येथे करण्यात आले असून, या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अनिल कुडपकर (मो. ९४२०९०७६६१) तसेच हॉस्पिटल क्रमांक ८२०८३२८११८ / ९३७००५६०७६ यावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!