SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथे यशस्वी जटिल शस्त्रक्रिया

कुडाळ : SSPM SSPM मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे येथे 61 वर्षीय श्री. सूर्यकांत बागकर यांच्यावर अत्यंत जटिल व यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णावर Composite Resection, Neck Dissection, PMMC Flap Reconstruction तसेच Tracheostomy ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ही शस्त्रक्रिया प्रख्यात कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. सौरभ फडके यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. शस्त्रक्रियेसाठी डॉ. वाजरटकर (Assistant General Surgeon) यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ म्हणून डॉ. सुरभी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांनी रुग्णालयात पहिला फॉलोअप तपासणी दौरा देखील पूर्ण केला आहे. फॉलोअपमध्ये रुग्णाच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा दिसून आली असून उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमधील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये कविता ओरोसकर, कविता वाटेगावकर, सुशांत बांदेकर, जगन्नाथ केरकर,अक्षता राणे व चेतन टारकर आणि अनिकेत बसवर यांचे विशेष योगदान लाभले.
तसेच रुग्णाच्या उपचार व फॉलोअप व्यवस्थापनामध्ये शांती आणि चेतना सिस्टर, वॉर्ड बॉय वैभव यांनी मोलाचे सहकार्य केले.
रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण वैद्यकीय टीमचे अभिनंदन करत अशा उच्च दर्जाच्या शस्त्रक्रिया आणि आरोग्यसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला आहे.

error: Content is protected !!