नेरूर येथे बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातर्फे किशोरवयीन मुलींच मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कुडाळ: बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालया तर्फे व कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर, लेट मिसेस इंगेट्राउट विद्या प्रतिष्ठान मुंबई आणि श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरूर यांच्या सहकार्याने कै .यशवंतराव नाईक यांच्या 42 व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरूर येथे मोफत ‘शालेय किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी शिबीर’ घेण्यात आले होते. त्यामध्ये कलेश्वर विद्यामंदिर च्या इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी सामुदायिक आरोग्य अधिकारी उपकेंद्र नेरूर १ चे डॉ.दत्तात्रय देसाई , बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, फिजीओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा.प्रथमेश हरमलकर, कलेश्वर विद्यामंदिरच्या शिक्षिका सौ. आरती राऊळ, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी उपस्थित विद्यार्थिनींची रक्त तपासणी करून विद्यार्थिनींना मल्टी -व्हिटॅमिन, सॅनिटरी पॅड नॅपकिन, पोषण पावडरचे ही वाटप करण्यात आले. भविष्यकाळात बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग महाविद्यालय, कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र नेरुर व फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या वतीने कुडाळ परिसरातील शाळांतील मुलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्याचा संबंधितांनी त्या त्यावेळी लाभ घ्यावा .असे आयोजकांतर्फे आवाहन ही कऱण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टाफ नर्स श्रुती देसाई यांनी केले.

error: Content is protected !!