जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड.
कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष आनंद कांडरकर,सचिव विनोद जाधव, खजिनदार संदीप सुकी, सरचिटणीस आर.के.सावंत, कायदेशीर सल्लागार ॲड.राजेंद्र खानोलकर तर सोशल मिडिया जिल्हा प्रमुख पदी प्रा. रूपेश पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच महिला जिल्हाध्यक्ष पदी सौ. मानसी परब, महिला जिल्हा सचिव सौ. संजना सावंत आदीची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष मिलिंद धुरी यांच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. पुढील एक वर्षासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशन सिंधुदुर्गची कार्यकारिणीसाठी सदस्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.