वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा २६ ऑक्टोबर रोजी

कुडाळ : वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. ज्या शाळेने आपल्याला घडवले आपल्या कुटुंबात आनंद फुलविला त्या शाळेच्या गोड आठवणींना उजाळा मिळावा या हेतूने या आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी एकत्र येऊन त्याचे आपापसातील ऋणानुबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. तरी शाळेचे सर्व माजी विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. दत्ता दळवी (माजी विद्यार्थी, माजी महापौर – मुंबई मनपा) – ९८१९००११००
श्री. नारायण गावडे (माजी विद्यार्थी) – ८८५०८३६८६९

स्थळ : विकास हायस्कूल सभागृह, कन्नमवार नगर, विक्रोळी (पू.)

error: Content is protected !!