राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त दिली जिव्हाळा सेवाश्रमला भेट

कुडाळ : रविवार दि. 19/10/2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमामध्ये राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त आश्रमास भेट दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी राधारंग फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थीना जिवनावश्यक वस्तूंचे तसेच फराळाचे वाटप केले. आश्रमाप्रती आपल्या भावना, व्यक्त करताना त्यांचे खरोखरच मन भरून आले. विशेषत: जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री बिर्जे यांनी चालविलेल्या ह्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतूक केले.. तसेच गोशाळे बाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सदर प्रसंगी राधारंग फाऊंडेशनच्या सौ. अरुणा रमाकांत सामंत , सौ. स्वाती रविंद्र वाजवलकर , श्री- प्रथमेश बळीराम नाईक, सौ-पूर्वा प्रथमेश नाईक, श्री. अमेय अभयकुमार देसाई , श्री सचिन सामंत ,श्री. संतोष सामंत व अध्यक्ष श्री. सुरेश बिर्जे, श्री. जयप्रकाश प्रभु ,कु.गितांजली बिर्जे, सौ. प्राजक्ता केळूसकर इत्यादी उपस्थित होते. संस्थाध्यक्षानी राधारंग फाऊंडेशनच्या ह्या सामाजिक उपक्रमाचे कौतूक करून त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!