कुडाळ शहरात मुंबई गोवा हायवेलगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द

शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई गोवा महामार्गलगत काल रात्री सुमारे 10:30 ते 11 च्या दरम्यान निकम यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेला आगीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

शिवसेना कुडाळ शहरप्रमुख, नगरसेवक अभिषेक गावडे यांनी घटनेची माहिती कळताच रात्री 11:30 वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व संपूर्ण घडलेल्या घटनेची माहिती घेऊन नुकसानग्रस्त श्री निकम यांना कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत केली. संपूर्ण घटनेचा कुडाळ पोलीस पंचनामा करत आहेत. यावेळी माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, नगरसेविका चांदणी कांबळी,चंदन कांबळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!