कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेचे उद्घाटन श्री.दाजी गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील तब्बल सात संघानी सहभाग नोंदविला या स्पर्धेत लोकराजा मित्र मंडळ येऊडीयेवाडी,रंगश्री ट्रिकसीन ग्रुप नेरूर देसाईवाडी, ओम शिवकृपा कला क्रीडा मंडळ नेरूर देऊळवाडी,साई हनुमान रेवटीवाडी वालावल, साऊळवाडी मित्र मंडळ नेरूर साऊळवाडी, साई कलेश्वर मित्रमंडळ नेरूर, ब्राह्मण देव मित्र मंडळ नेरूर अशा सात संघानी सहभाग घेतला.या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रक्कम १२०००/- व चषक लोकराजा मित्रमंडळ येऊडीयेवाडी यांनी पटकाविले तर द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 7000/- व चषक ओम शिव कृपा कला क्रीडा मंडळ नेरुर देऊळवाडी यांनी पटकाविले तर तृतीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 4000/- व चषक रंगश्री ट्रीकसीन ग्रुप नेरूर देसाईवाडी यांनी पटकाविले,त्याचप्रमाणे उत्तेजनार्थ पारितोषिक रोख रक्कम रुपये ३०००/- व चषक श्री.ब्राह्मण देव मित्र मंडळ नेरूर यांनी पटकाविले.या स्पर्धेत सहभागी संघास मानधन म्हणून रोख रक्कम रुपये २०००/- व चषक श्री.साई हनुमान रेवटीवाडी वालावल,साऊळवाडी मित्रमंडळ नेरूर साऊळवाडी, श्री.साई कलेश्वर मित्रमंडळ नेरूर या संघाना मानधन व चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत दाजी गावडे यांनी उद्योजक श्री रुपेश पावसकर यांच्या बद्दल गौरव उद्गार काढले त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की उद्योजक रुपेश पावसकर यांनी नेरूर गावात कला जोपासण्याचे काम केले असे गौरव उद्गार श्री.दाजी गावडे यांनी काढले त्याचप्रमाणे चारुदत्त देसाई देवस्थान स्थानिक सल्लागार कमिटी अध्यक्ष तथा माजी सरपंच यांनी नेरुर गावात प्रथमच अशी स्पर्धा घेण्यात आली व कलाकारांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याची सुवर्णसंधी उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी उपलब्ध करून दिली त्याचप्रमाणे भविष्यात स्पर्धा होतच राहतील परंतु इतर ठिकाणी होणाऱ्या गर्दीप्रमाणे नेरूर गावात देखील अशाप्रकारे गर्दी होऊ शकते हे श्री.रुपेश पावसकर यांनी सिद्ध करून
दाखवले असे गौरव उद्गार श्री.चारुदत्त देसाई यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. त्याचप्रमाणे नेरूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर यांनी आपल्या मनोगतात उद्योजक रुपेश पावसकर हे सतत शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून राबवत असतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद व आदर्शवत आहे असे गौरव उद्गार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन करताना स्पर्धा या भविष्यात होत राहतील या बद्दल तीळमात्र शंका नाही. याठिकाणी निवे दक श्री.निलेश गुरव यांनी स्पर्धेच्या नियम व अटींसह आपल्या निदर्शनास आणून दिले की,नरकासुर वध स्पर्धा या शहरामध्ये होत असतात. परंतु ते आपल्या गावामध्ये होणे आवश्यक आहे असे माझ्या निदर्शनास आणून दिले यावेळी मी त्यांना शब्द दिला की स्पर्धा आपण घेऊ परंतु आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याप्रमाणे त्यांनी आपणास स्पर्धा कशी घ्यावी याच्या रूपरेषेची यादी आपणास पाठविली त्याप्रमाणे आपण ही स्पर्धा आयोजित केली. नेरूर गाव हा कलेचा देव कलेश्वर यांचा गाव असल्याने या स्पर्धेचा फायदा गावातील लोकांना होईल.नेरूर गावातील कलाकार आपली कला संस्कृती साता समुद्रापार घेऊन जातील असे गौरवोद्गार उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी काढले.या स्पर्धेसाठी दोन परीक्षक नेमण्यात आले होते.परीक्षक म्हणून श्री प्रशांत धोंड सर त्याचप्रमाणे दुसरे परीक्षक श्री.रुपेश नेवगी सर यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन श्री निलेश गुरव यांनी उत्कृष्टरित्या केले. या संपूर्ण स्पर्धेसाठी युट्युब च्या माध्यमातून चित्रीकरण नेरूर गावचे सुपुत्र श्री.जयवंत मेस्त्री यांनी केले.या स्पर्धेसाठी साउंड सर्व्हिसचे काम श्री.विजय नेरुरकर यांनी उत्कृष्ट रित्या केले. लाईट सिस्टमचे काम श्री.वृषभ वाघ यांनी उत्कृष्टरित्या केले.यावेळी व्यासपीठावर उपस्थित रणझुंजार मित्र मंडळाचे सर्वेसर्वा उद्योजक श्री रुपेश पावसकर, नेरूर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर,देवस्थान स्थानिक सल्लागार कमिटी अध्यक्ष तथा माजी सरपंच श्री चारुदत्त देसाई, माजी सरपंच श्री शेखर गावडे, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री दाजी गावडे ,श्री बाळा घाडी,श्री.अशोक पावसकर,श्री. आजीम मुजावर,यशस्वी उद्योजिका सौ. रुद्रा रुपेश पावसकर, ओम शिव कृपा कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री गिरीश नेरुरकर ग्रामपंचायत सदस्य श्री समीर नाईक ग्रामपंचायत सदस्य संतोष कुडाळकर,ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण नेरूरकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.उमेश परब,श्री.संतोष परब,श्री.विलास मेस्त्री,श्री.सौरभ पाटकर,श्री.पियो खतीप, रिक्षा युनियन जेष्ठ सदस्य श्री.चंद्रकांत पाटकर मंडळाचे सक्रीय कार्यकर्ते श्री.सुधीर नेरूरकर,श्री.कल्पेश मार्गी,श्री.आनंद नेरुरकर, श्री.नरेश नेरुरकर,श्री.प्रभात वालावलकर,श्री.कृष्णा उर्फ गोट्या पाटकर,श्री.संतोष परब,श्री.सतीश सावंत,श्री.अमोल श्रृंगारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.त्याचप्रमाणे बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी बैल सजावट स्पर्धा सादरी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा श्री.देव कलेश्वर मंदिर ते नेरूर चव्हाटा अशी रंगणार आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन रणझुंजार मित्रमंडळ व उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांनी केले आहे.

रणझुंजार मित्र मंडळ उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य कलेचा देव कलेश्वर नरकासुर वध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद………..
1
/
82
माजी आमदार वैभव नाईक यांची सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका #vaibhavnaik #sindhudurg #kudal
काका कुडाळकर यांची पत्रकार परिषद #kudal #sindhudurg
जनता आमच्या पाठीशी असल्याने विजय आमचाच - रुपेश आमडोसकर #kankavali #sindhudurg
कळसुली मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित - लक्ष्मण गावडे #kankavali
जनता सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करुन अनंत पिळणकर यांना विजयी करेल - विनायक राऊत #vinayakraut
मला माझ्या गावाबद्दल सार्थ अभिमान, माझं गाव कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही
मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित -शितल दळवी #sindhudurg #kudal
दादा साईल कामाला कुठेळी कमी पडणार नाही - आ. निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #kudal
मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभसंकेत - अनंत पिळणकर #kankavali
आता निलेश राणे आमदार आहे; कोणीही वंचित राहणार नाही Nilesh Rane #nileshrane
आ. निलेश राणे यांनी भर व्यासपीठावरून दिला शब्द #nileshrane #kudal
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
1
/
82

Subscribe









