तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरचे यश

कुडाळ : तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरने विशेष यश संपादन केले असून १९ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेत गोळा फेक या क्रिडाप्रकारात प्रशालेच्या आर्या मिलिंद गावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या कामगिरीमुळे प्रशालेच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवला गेला असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!