दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने जाणारी कार ओहोळात कोसळली

मोटरसायकलला चुकविण्याच्या नादात घडली घटना

दोडामार्ग : दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने जाणारी कार अचानक समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलला चुकविण्याच्या नादात थेट ओहोळात गेली. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठ नुकसान झालय.

याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने एक व्हॅगनार कार निघाली होती. येथील सिद्धिविनायक मंदिर पलीकडील पूलानजीक ही कार आली असता कारच्या समोर अचानक एक मोटारसायकलस्वार आला. त्याला वाचविण्याच्या नादात कार चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले. ही कार थेट ओहोळात गेली. सूदैवाने या कारमध्ये फक्त चालक होता. त्याला झालेली किरकोळ जखम वगळता कारचे नुकसान झाले. सदरची कार भेडशी येथील एका युवकाची असल्याचे समजते. कारचालकाला येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

error: Content is protected !!