Category News

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार..

ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा.. कुडाळ : मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा…

जिल्हा परिषद सदस्य श्री.रुपेश पावसकर यांच्या मागणीला यश

१९ जून ते ३० जून या कालावधीत शाळांचे कामकाज सकाळच्या सत्रात कुडाळ : अलनिनोच्या प्रभावामुळे शालेय विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करा अशा मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना पत्र लिहिले…

दोडामार्ग – विर्डी येथे धबधब्याच्या जलकुंडात युवक बुडाला

जलकुंडाची खोली तब्बल १२ माडांहून अधिक असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज दोडामार्ग : तालुक्यातील विर्डी येथे धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय २३) हा युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती…

सिंधुदुर्गातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा उद्यापासून सकाळच्या सत्रात

१९ ते ३० जूनपर्यंत बदललेल्या वेळापत्रकानुसार शाळा भरणार सकाळी ७.३० ते ११.३० या वेळेत भरणार शाळा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीला आणी पाठपुराव्याला मोठे यश सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण…

खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’तंर्गत ४७ कोटींपेक्षा अधिक निधीचे १२ पूल मंजूर!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण रस्ते आणि दळणवळण व्यवस्थेला मोठा वेग मिळणार आहे. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना-भाग ३’ (PMGSY-III) अंतर्गत जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी एकूण ४७ कोटी ३६ लाख ६४ हजार रुपये निधीच्या १२…

जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे ठरले देवदूत

14 वर्षाच्या तन्मयला मिळाले नवे आयुष्य कणकवली : कणकवली तालुक्यातील नागवे गावातील १४ वर्षीय तन्मय गणेश खेडेकर याच्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे हे मदतीचा आधार ठरले आहेत. लहानपणापासूनच तन्मयला नाक आणि कानामध्ये असलेल्या गाठींमुळे श्वास घेण्यास तसेच ऐकण्यास त्रास…

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयाकडील कंत्राटी भरतीत स्थानिक उमेदवारांना डावलून जिल्हाबाहेरील उमेदवारांना नियुक्ती !

जिल्हा परिषद आरोग्य विभागातील “एक” कर्मचारी मेडिकल कॉलेज व रुग्णालयाकडील बहुतांश सेवांचा ठेकेदार..! “अधिष्ठातांकडून जिल्ह्याबाहेरील लोकांना पोसण्याचा धंदा! – प्रसाद गावडेंचा आरोप सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा कारभार म्हणजे “जिल्हावासीय उपाशी व जिल्ह्याबाहेरील तूपाशी” असाच काहीसा चालू असून जिल्हा…

स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात

तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल – अभिषेक गावडे कुडाळ : स्मार्ट मीटर बसवताना ग्राहकांना पूर्वसूचना देण्यात याव्यात तसेच ग्राहकांना स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा…

आजगाव धाकोरा ग्रामस्थांनी पुकारलेल्या मायनींग विरोधी लढ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा.

मनसे नेते शिरीष सावंत यांची कृती समिती अध्यक्ष श्री अजित नातु यांच्यासोबत फोन वरून चर्चा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांची माहिती. शासनामार्फत आजगाव, धाकोरा, आरवली,सोनसुरे व आजूबाजूच्या इतर सर्व गावांमध्ये मायनिंगचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या मायनिंग प्रकल्पामुळे आजगाव…

मुंबई-गोवा महामार्गावर हुमरमळा येथे एकाच दिवशी दोन अपघात

दुचाकीस्वार युवक जखमी तर दुसऱ्या अपघातात कारचा टायर फुटला कुडाळ : तालुक्यातील वाडी हुमरमळा येथे मुंबई-गोवा महामार्गावर बुधवारी दुपारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात घडले. कासले दुकान आणि राणे दुकान बसस्टॉप परिसरात झालेल्या या अपघातांमध्ये एका दुचाकीस्वारास दुखापत झाली असून सर्व…

error: Content is protected !!