शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियन च्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील “द हिल्टन हॉटेल” येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी या सभेस खालील मान्यवर उपस्थित होते. मान. नाम. उदयजी सामंत साहेब -उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी, मान. श्री. रवींद्र वायकर साहेब शिवसेना खासदार उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ, मान. आमदार दिलीपजी लांडे साहेब, मान. आमदार श्री प्रकाशजी सुर्वे साहेब, शिवसेना वैद्यकीय कक्ष राज्य प्रमुख श्री मंगेश चिवटे साहेब, मान . श्री कुणाल सरमळकर युनियनचे जनरल सेक्रेटरी व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी युनियनच्या काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवसेनेचे काका कुडाळकर यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मान. उद्योग मंत्री नाम. उदयजी सामंत साहेब यांचे हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्यावर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ व चिपी विमानतळ येथील युनियनची जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी सदस्य कामगार व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेने केलेल्या कार्याचे कौतुक करत भविष्यात खंबीर पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संसद रत्न लोकप्रिय खासदार शिवसेना युवा नेतृत्व श्रीकांतजी शिंदे साहेब यांनीही दूरध्वनीद्वारे सर्वांशी संवाद साधून मार्गदर्शन केले. संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री कुणाल सरमळकर यांनी ही युनियन उभारणे केलेल्या कार्याचा कार्याचे सर्वांनी कौतुक केले त्यांच्या नेतृत्वामुळेच फक्त एक वर्षात युनियनची सदस्य संख्या 5000 पेक्षा जास्त होऊ शकली. भविष्यात सर्व विमानतळांवर शिवसेना पुरस्कृत या युनियनचा झेंडा फडकवण्याचा सर्वांनी निर्धार केला.


Subscribe










