महिलेवर अत्याचार

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

माणगाव येथील युवकाला अटक

कुडाळ : महिलेचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने लगट करून अत्याचार करणे, त्याचे अश्लील चित्रीकरण करून तो व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी योगेश सुरेश चव्हाण (३८, रा. माणगाव कट्टावाडी, ता. कुडाळ) या संशयिताला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती कुडाळ पोलीसांनी दिली आहे.

याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस) कलम ७४, ७५(२), ६४(२) (m) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश सुरेश चव्हाण याने फिर्यादी महिलेचा १ मार्च २०२५ ते ३० जून २०२६ या कालावधीत इच्छेविरुद्ध पाठलाग केला. एका चेंजिंग रूममध्ये तिला पकडून तिच्याशी लगट केली. त्यानंतर तिच्या घरी जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच हा विषय नातेवाईकांना सांगण्याची धमकी देऊन तिचे नकळत अश्लील चित्रीकरण केले आणि तो व्हिडिओ व्हायरल केल्याची तक्रार महिलेने दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्री. बच्छाव (नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग) करीत असून, सहायक पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती कुडाळ पोलीसांनी दिली.

error: Content is protected !!