सिंधुदुर्गनगरी : कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक ज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची आणि आत्मसात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये युरोप येथे फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दुग्धोत्पादन तसेच चीन येथे विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो यांचा अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.
योजनेअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के रकमेचा खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करणे आवश्यक राहील.
या योजनेसाठी अर्जदार हा मुख्य व्यवसाय शेती असलेला शेतकरी असावा. अर्जदाराकडे ॲग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत फार्मर आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक असून अर्ज सादर करताना वय किमान २५ वर्षे पूर्ण असावे. शेतकरी कुटुंबातील केवळ एका व्यक्तीस लाभ देण्यात येईल. अर्जदाराकडे किमान एक वर्ष वैधता असलेला पासपोर्ट असणे आवश्यक असून एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणेही बंधनकारक आहे. तसेच अर्जदार कोणताही शासकीय अथवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए (CA), अभियंता किंवा कंत्राटदार नसावा. यापूर्वी शासकीय अर्थसाहाय्याने परदेश अभ्यास दौरा केलेला नसावा.
जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने व्हिडिओग्राफीसह सोडत (लॉटरी) काढून करण्यात येणार आहे. निवड प्रक्रियेत किमान एक महिला शेतकरी तसेच किमान एक राज्य अथवा केंद्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य राहील.
इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र 1), स्वयंघोषणापत्र, हमीपत्र (प्रपत्र 2), आधार कार्ड, फार्मर आयडी, पासपोर्टची छायांकित प्रत, शिधापत्रिका (रेशन कार्ड) आणि वैद्यकीय प्रमाणपत्र यांसह आपल्या संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 20 ऑगस्ट 2026 पर्यंत अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










