सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता पीक विमा संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या उत्पादनात घट झाल्यास नुकसानभरपाईचा लाभ मिळतो.
महत्त्वाची माहिती :
✅ सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात व नाचणी ही प्रमुख विमा संरक्षित पिके आहेत. ✅ आतापर्यंत १५,८३२ शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदवला आहे. ✅ पीक विमा अर्ज करण्याची मुदत १० ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, बँक किंवा Crop Insurance App च्या माध्यमातून १० ऑगस्टपूर्वी पीक विमा अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे.