Category बातम्या

महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा आमदारांचा प्रयत्न

उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण : तालुक्यात जी विकासकामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाली होती. विद्यमान आमदार निलेश राणे या कामांचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत. या उलट नुकत्याच झालेल्या राज्याच्या आर्थिक बजेटमधून मतदार संघातील…

फणसगाव गढीताम्हाणे पंतप्रधान ग्रामसडक रस्त्याच्या कामाचे ग्रामस्थांकडून पोलखोल

पालकमंत्र्यांच्या पीएना ग्रामस्थांकडून व्हिडिओ कॉल पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी रुपये खर्च होऊ घातलेल्या देवगड तालुक्यातील फणसगाव गढीताम्हाणे रस्त्याच्या कामातील झोल ग्रामस्थांनी उघड केला असून डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे काम हाताने उखडल्याने या ठिकाणी असलेले शाखा अभियंता पुरी व उप…

युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत श्रीराम नवमी उत्सव २०२५

कुडाळ : शनिवार दिनांक ५ व ६ एप्रिल रोजी युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी पुरस्कृत व श्री ब्राह्मणदेव मित्र मंडळ आयोजित श्रीराम नवमी उत्सव २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकर वाडी सामाजिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात.यावेळी…

अखेर त्या बस चालकावर गुन्हा दाखल

पावशी येथे बस व कार यांच्यात झाला होता अपघात कुडाळ : तालुक्यातील पावशी – बेलनादिवाडी येथे कार आणि एसटी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी एसटी चालक मिलिंद साहेबराव कोळी (वय ३४, सध्या रा. कुडाळ एसटी डेपो, मूळ रा.…

घरात राहणाऱ्या कामगारानेच लांबविले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी

पोबारा करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात कणकवली पोलिसांच्या पथकाला यश पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे विशेष प्रयत्न कणकवली : येथील विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी…

गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी

सावंतवाडी : तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या धडकेत राणेवाडीतील स्वप्निल सुनिल सावंत (वय २३) हा युवक किरकोळ जखमी झाला. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास शिरशिंगे-जलमदेव परिसरात घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या…

देवगड येथे अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई

देवगड : महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ व सुधारणा अधिनियम, २०२१ अंतर्गत अनधिकृत एल.ई.डी. मासेमारीवर कारवाई करण्यात आली आहे. दि. ०२ एप्रिल २०२५ रोजी रात्री गिर्ये, देवगड समुद्रकिनाऱ्याजवळ मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री. पार्थ तावडे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी,…

बांदा – ओटवणे मार्गावर गोवा बनावटीच्या दारुसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने बांदा ओटवणे रोडवर, हॉटेल सुभेदार जवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 13,03,640 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मा.श्री. मनोज शेवरे साहेब,…

वीज पडून बैलाचा मृत्यू

देवगड : देवगड तालुक्यातील खुडी येथे मिलींद घाडी यांच्या गोठ्यावर आज सकाळी ०५.३० वाजता वीज पडून त्यांच्या दोन गुरांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. देवगड तालुक्यातील मिलिंद घाडी रा. खुडी यांच्या गोठ्यावर ३ एप्रिल २०२५ला गुरुवारी पहाटेच्या ५.३०च्या…

तो चोरटा साधारण असा दिसत होता

पोलिसांकडून स्केच तयार वैभववाडी : नापणे धनगरवाडा येथील वृद्धावरजीवघेणा हल्ला करून सोनसाखळी घेऊन पसार झालेल्या चोरट्याचे पोलीसांनी स्केच तयार केले आहे. त्या वर्णनांची व्यक्ती कुठे आढळल्यास त्वरित पोलीसांशी संपर्क साधण्याचं आव्हान करण्यात आले आहे. नापणे येथील पुरुषोत्तम नरहरी प्रभुलकर, वय…

error: Content is protected !!