राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने बांदा ओटवणे रोडवर, हॉटेल सुभेदार जवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 13,03,640/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मा.श्री. मनोज शेवरे साहेब, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार बांदा ओटवणे रोडवर, हॉटेल सुभेदार जवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे दि.02/04/2025 रोजी रात्री 10.30 वाजताचे सुमारास अवैध मद्य वाहतुकीच्या संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना चारचाकी महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. MH-24-AB-6249 या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनाच्या पाठीमागील हौदयामध्ये भाजीच्या रिकाम्या कॅरेटच्या खाली लपवून ठेवलेले व फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असणारे विविध ग्रॅन्डचे 64 बॉक्स अवैध मद्यसाठा आढळून आला. सदर प्रकरणीमद्याचे मालक शंकर दत्तात्रय मस्के, वय 43 वर्षे व वाहन चालक सचिन शिवाजी वाघमारे वय 27 वर्षे, दोघेही रा. बोरामणी, सोलापूर यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं.रु. 6,83,640/- किंमतीचे मद्य, रु.6,00,000/- किंमतीचे चारचाकी वाहन व अंदाजे रु.20,000/- चे रिकामी कॅरेट असा एकुण अं.रु.13,03,640/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.सदर कारवाई श्री. भानुदास खडके, निरीक्षक, श्री. प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक, श्री. धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक, श्री. अभिषेक खत्री, जवान, श्री. सागर सुर्यवंशी, जवान, श्री. सतीश चौगुले, जवान यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास श्री. प्रदीप रास्कर, दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली हे करीत आहेत.













