अखेर त्या बस चालकावर गुन्हा दाखल

पावशी येथे बस व कार यांच्यात झाला होता अपघात

कुडाळ : तालुक्यातील पावशी – बेलनादिवाडी येथे कार आणि एसटी बस यांच्यात आज सकाळी झालेल्या अपघात प्रकरणी एसटी चालक मिलिंद साहेबराव कोळी (वय ३४, सध्या रा. कुडाळ एसटी डेपो, मूळ रा. सांगवी खुर्द, ता. यावल, जि. जळगाव) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कार चालक केशव श्रीधर सरवटे (वय ५६, रा. वारंगाची तुळसुली, ता. कुडाळ) यांनी तक्रार दिली आहे.

केशव सरवटे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, ते त्यांची मारुती वॅगनार गाडी घेऊन सकाळी ६.३५ वा.चे मानाने त्यांच्या मुलीला कसाल येथील कॉलेजमध्ये सोडण्यासाठी घरातुन निघाले. ते वॅगनार गाडी चालवित घेऊन घावनळे कुडाळ रोड ने जात असताना वॅगनार गाडी पावशी बेलनदी वाडी येथील तेली यांचे घरासमोरील रोडवरील वळणावर आली असता माझ्या वॅगनार गाडीचे समोरुन कुडाळ ते बामणादेवी एस.टी.बस वरील चालकाने आपल्या ताब्यातील एस टी बस भरधाव वेगात चालवुन सकाळी ६.४५ वा. चे मानाने माझी वॅगनार गाडीला माझ्या उजव्या बाजुने ड्रायव्हर साईडने समोरुन धडक देऊन अपघात केला.

सदर अपघातानंतर वॅगनार गाडी रस्त्यावरच एस.टी. बस समोर आडवी होऊन बंद पडली. सदर अपघातात सरवटे यांच्या बाजुस बसलेली त्यांच्या मुलीचे तोंड गाडीच्या डॅशबोर्डला आपटल्याने तिचे तोंडातील दातांना मार लागुन दुखापत झाली. तसेच वॅगनार गाडीच्या समोरील बंपर, लोअर ग्रिल, अप्पर ग्रिल, फाँग लॅम्प, उजव्या साईडचे फेंडर, बोनेट, उजव्या बाजुची हेडलाईट, आतील हुक लॉक चेंबर, उजव्या बाजुचे ऑफरॉन इत्यादीचे तुटुन फुटुन नुकसान झाले व एस.टी.चे समोरील उजव्या साईडचे पॅनल तसेच त्याखालील बंपर तुटुन व फुटुन नुकसान झालेले आहे.

error: Content is protected !!