घरात राहणाऱ्या कामगारानेच लांबविले सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी

पोबारा करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेण्यात कणकवली पोलिसांच्या पथकाला यश

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांचे विशेष प्रयत्न

कणकवली : येथील विद्यानगर येथील नक्षत्र अपार्टमेंटमध्ये राहणारे हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांच्या फ्लॅटमधील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमारती खाली उभी करून ठेवलेली दुचाकी असा १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल घरातच राहणाऱ्या कामगाराने लंपास केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्यादी हरिश्चंद्र विठ्ठल चव्हाण यांनी तक्रार दिली होती. त्यानुसार संशयिताविरोधात BNS 2023 चे कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथक प्रयत्नांनी आरोपी रणजीत शंकर बैसवाल याला कणकवली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घटना घडल्यानंतर घरातून दागिने, मोटारसायकल व रोख रक्कम घेऊन पसार झालेला रणजीत शंकर बैसवाल (वय २८ रा. नेपाळ ) याला तब्बल बारा तासांतच ताब्यात घेण्यात कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ व सहकाऱ्यांना यश आले आहे. चोरी केल्यानंतर आरोपी रणजीत शंकर बैसवाल (वय २८ रा. नेपाळ ) याने नेपाळ गाठण्यासाठी चक्क पनवेल गाठले होते. मात्र मोबाईल लोकेशन व गोपनीय मिळालेली माहिती व त्यातच रेल्वे पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे पनवेल रेल्वे स्थानक येथून ताब्यात घेण्यात यश आले. दरम्यान घटनेत चोरीस गेलेले सोन्याची कुडी, दोन सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम ४४०००/- हस्तगत करण्यात आले. तसेच पळवून नेलेले दुचाकी देखील ताब्यात घेण्यात कार्यवाही सुरू आहे.

हे कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, श्री. पाटील, यांनी केली. तर या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार विनोद सुपल करत आहेत.

error: Content is protected !!