गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी

सावंतवाडी : तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या धडकेत राणेवाडीतील स्वप्निल सुनिल सावंत (वय २३) हा युवक किरकोळ जखमी झाला. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास शिरशिंगे-जलमदेव परिसरात घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या गावी शिरशिंगे येथे आपल्या दुचाकीवरून परतत असताना सकाळी ८.३० च्या सुमारास शिरशिंगे-जलमदेव परिसरात गवा अचानक रस्त्यावर आला व समोरून येणाऱ्या दुचाकीस्वार स्वप्निल वर हल्ला केला. या हल्ल्यात स्वप्नील च्या पायाला मुका मार लागला असून त्याला नजीकच्या दवाखान्यात येथील स्थानिक ग्रामस्थांनी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. याबाबतची माहिती गावचे पोलीस पाटील गणू राऊळ यांनी वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वप्निलच्या घरी भेट घेतली व पाहणी केली. दिवसाढवळ्या गव्याच्या वावरामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वन विभागातील अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी गावचे सरपंच दीपक राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ यांनी केली आहे.

error: Content is protected !!