लाईव्ह सामन्यात बांगलादेशच्या क्रिकेटपटूचा हृदय विकाराने मृत्यू

नवी दिल्ली: लाईव्ह सामन्यात एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा खेळाडू बांग्लादेश संघाचा माजी कॅप्टन तमीम इक्बाल आहे. एकीकडे आयपीएल सुरू असताना बांग्लादेश प्रिमियर लीग देखील सुरू आहे. याच बांग्लादेश प्रिमियर लीगमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

काय आहे सविस्तर वृत्तांत?

माजी कर्णधार तमीम इक्बालला सोमवारी सकाळी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामना खेळत असताना तमिमला हृदयविकाराचा झटका आला होता. सावर येथे मोहम्मद स्पोर्टिंग क्लब आणि शाईनपुकुर क्रिकेट क्लब यांच्यातील ढाका प्रीमियर डिव्हिजन क्रिकेट लीग सामना खेळत असताना त्याच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या अन् लगेचच त्याला हृदयविकाराचा झटका आला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीदरम्यान, तमीम इक्बालने यावर्षी जानेवारीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

error: Content is protected !!